ऱाष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि कुटुंबियांवर नेमके आरोप कोणते? घ्या जाणून

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर, छगन भुजबळ यांच्यावर नेमके कोणते आरोप होते.

Updated: May 4, 2018, 04:35 PM IST
ऱाष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि कुटुंबियांवर नेमके आरोप कोणते? घ्या जाणून title=

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यानंतर, छगन भुजबळ यांच्यावर नेमके कोणते आरोप होते, याची अनेकांना उत्सुकता होती. भुजबळांना २ वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे, छगन भुजबळ यांचा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १४ मार्च २०१६ पासून - २ वर्षापासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम होता. छगन भुजबळ तरूंगात असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. 

पहिला आरोप

२००५ मध्ये सार्वजिनक बांधकाम मंत्री असताना, निविदा न काढता, कंत्राट न काढल्याचा आरोप भुजबळ आणि कुटूंबियांवर आहे. अंधेरी आरटीओच्या जमिनीवर बिल्डरला बांधकामाचे अधिकार बहाल केल्याचा आरोप आहे. याच बिल्डरनं दिल्लीतील महाराष्ट्र सदन, अंधेरीतील आरटीओ इमारत आणि मलबार हिलला राज्य अतिथीगृह बांधण्याची अट घातली. या कंत्राटांच्या मोबदल्यात भुजबळांना बेनामी कंपनीच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

 

दुसरा आरोप

समीर आणि पंकज भुजबळ संचालक असलेल्या देविशा इन्फ्रास्ट्रक्चरकडून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच खरेदीदारांना ४४ कोटींना फसवल्याचा समीर आणि पंकज यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. अंधेरीतल्या कंत्राटाच्या बदल्यात मिळालेल्या पैशांचा खारघर बांधकाम प्रकल्पात वापर केल्याचा आरोपही आहे.