मुंबई : बहुप्रतिक्षित आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मोनो रेलचा पहिला आणि एकमेव टप्पा एका महिन्याच्या आत सुरू करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी ११ सप्टेंबरला लागलेल्या आगीमुळे चेंबूर ते वडाळा हा पहिल्या टप्प्यातला मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.
तसंच उर्वरीत मार्गावरील वडाळा ते जेकब सर्ल या मार्गावरच्या चाचण्याही बंद पडल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. तसंच निवृत्त रेल्वे सुरक्षा आयुक्त यांच्या शिफारशीनुसार काही उपाययोजनाही करण्यात आल्या.
दोन स्थानकांच्या दरम्यान प्रवासी अडकल्यास त्यांना बाहेर काढण्यासाठी मोनो मार्गावर पॅसेज वे बनवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत लेखी उत्तरात मोनो रेलचा पहिला टप्पा एका महिन्याच्या आत सुरु करण्याचं एमएमआरडीएकडून प्रस्तावीत असल्याची माहिती देण्यात आली.