चेंबूर ते वडाळा मोनो रेल पुन्हा सेवेत

 चेंबूर ते वडाळा मोनो रेल एक सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार आहे

Updated: Aug 5, 2018, 10:48 PM IST
चेंबूर ते वडाळा मोनो रेल पुन्हा सेवेत title=

मुंबई : गेल्या नऊ महिन्यापासून बंद असणारी चेंबूर ते वडाळा मोनो रेल एक सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार आहे. म्हैसूर कॉलनी स्थानक इथे मोनो च्या डब्याला लागलेल्या आगी नंतर मोनो रेल बंद करण्यात आली होती.आता नऊ महिन्या नंतर ही सेवा सुरू होतेय. वडाळा ते सात रस्ता हा दुसरा टप्पा सुरू कधी होणार या बद्दल मात्र प्रवाश्यांन मध्ये उत्सुकता आहे.

दुसऱ्या टप्प्याला सुरूवात  

 हा दुसरा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत.मोनो चा सतत होत असणारा खोळंबा,रखडलेला दुसरा टप्पा या मुळे आता नव्याने पुन्हा सुरू होणारी मोनो रेल सुरळीत चालावी अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.