मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, सांगितला राज्याच्या विकासाचा अजेंडा

शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक, महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाचं उद्दिष्ठ

Updated: Jun 30, 2022, 09:53 PM IST
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, सांगितला राज्याच्या विकासाचा अजेंडा title=

Maharashtra Shinde Government : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज शपथ घेतली. राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडला. तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यानी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात दाखल झाले. मंत्रालयात शिंदे सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. 

महाराष्ट्रातले जे रखडलेले प्रकल्प आहेत, त्याला चालना देण्याचा निर्णय पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास हेच आमचं उद्दिष्ठ असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या पीक पाण्याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. 

राज्याच्या पुढच्या वाटचालीसाठी, राज्याच्या प्रगतीसाठी जे काही प्रकल्प आपण हाती घेतले होते, काही कारणामुळे जे प्रकल्प रखडले आहेत, ते पूर्ण करण्यासंदर्भात आज पहिल्याच कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. त्यात पीकपाणी असेल, जलयुक्त शिवार असेल, मेट्रो प्रकल्प असेल, ते पूर्ण करण्याचं प्रयत्न करु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

लोकांना जे अपेक्षित काम आहे ते आपल्याला करायचं आहे. देवेंद्र फडणवीस काळात जे प्रकल्प सुरु झाले ते प्रगतीपथावर आहेत, ते पूर्वत्वास नेले पाहिजेत, त्यादृष्टीने निर्णय घेतलेला आहे.  सर्वच क्षेत्राला न्याय देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. राज्याला अपेक्षित असलेलं काम आमच्याकडून होईल, असा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी  हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची जी भूमीका होती आणि या राज्याचा विकास हा आमचा अजेंडा असल्याचं सांगितलं.