मुंबई : मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांची आज मुंबईत भव्य जाहीर सभा आहे.
मातोश्रीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बीकेसीतल्या सभास्थानी निघाले. पण त्यांना ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला.
बीकेसीत मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून शिवसैनिक सभास्थानी आले आहेत. बस आणि फोर व्हिलरमधून हजारो शिवसैनिक बीकेसीत आले आहेत. त्यामुळे बीकेसीकडे जाणारा रस्ता जाम झाला आहे.
याचाच फटका मुख्यमंत्र्यांनाही बसला आहे. पाच मिनिटांचं अंतर कापण्यासाठीही मुख्यमंत्र्यांना अर्धातासाचा वेळ लागला. पोलिसांनी रस्ता मोकळ्या करण्याचं काम केलं.
दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे यांनाही ट्रॅ्फीक जामचा सामना करावा लागला. एकनाथ शिंदे यांनी आपली कार सोडून चक्क स्कूटीवरुन सभास्थळ गाठलं