ठाकरे विरुद्ध ठाकरे सभा, हिंदुत्वाचा हुंकार, विरोधकांवर बरसणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच इशारा दिल्याप्रमाणे उद्याच्या (14 मे) सभेत मास्क काढून बोलणार आहेत.

Updated: May 13, 2022, 11:20 PM IST
ठाकरे विरुद्ध ठाकरे सभा,  हिंदुत्वाचा हुंकार, विरोधकांवर बरसणार title=

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आधीच इशारा दिल्याप्रमाणे उद्याच्या (14 मे) सभेत मास्क काढून बोलणार आहेत. अर्थातच त्यांच्या निशाण्यावर उद्या विरोधकांसह त्यांचा भाऊही असण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर उद्या कोण कोण असेल.. पाहुया. (chief minister uddhav thackeray public meeting in bkc on 14 may)

उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

उद्धव ठाकरे राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.  फडणवीस आणि भाजप पोलखोलवर कडाडण्याचीही शक्यता आहे. राणा दाम्पत्यावर शाब्दिक फटकारे उडतील असंही म्हटलं जात आहे. केंद्र सरकारवरही टीकेचा प्रहार करण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री वाढत्या महागाईवर ताशेरे ओढणार तसंच केंद्रीय यंत्रणांचीही पोलखोल केली जाईल आणि आगामी निवडणुकांचं रणशिंगही याच सभेत फुंकलं जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. 

बीकेसीतली सभा भव्य दिव्य करण्यासाठी शिवसेना सज्ज झालीय. सुमारे दोन लाख शिवसैनिक या सभेला येतील, असा अंदाज आहे. मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अनिल परब या सभेवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. हिंदुत्वासह इतर अनेक मुद्यांवर मुख्यमंत्री विरोधकांचा समाचार घेतीलच. पण या सभेनंतर जास्त धार येईल ती ठाकरे विरद्ध ठाकरेंच्या संघर्षाला.