मुंबईत स्वच्छतागृह कोसळून दोघांचा मृत्यू, एक जण ढिगाऱ्याखाली

भांडूपमध्ये स्वच्छतागृह कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. आणखी एकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

Updated: Apr 28, 2018, 12:22 PM IST
मुंबईत स्वच्छतागृह कोसळून दोघांचा मृत्यू, एक जण ढिगाऱ्याखाली title=

मुंबई : भांडूपमध्ये स्वच्छतागृह कोसळून दोघांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. आणखी एकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

स्वच्छतागृह दुर्घटनेत बाबूलाल देवासी आणि लाभूबेन जेठवा या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे दोन्ही मृतदेह अद्याप बाहेर काढण्यात आलेले नाही. या ढिगाऱ्याखाली आणखी एक जण अडकला असण्याची भीती व्यक्त होतेय. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्यात.  सकाळच्या सुमारास भांडूप इथल्या टँक रोड परिसरात हे स्वच्छतागृह कोसळलं.