....हे कारण देत मुख्यमंत्र्यांनी नाही पाहिला 'तान्हाजी'

 'तान्हाजी' या चित्रपटाने रसिकांची मनं जिंकली, पण.... 

Updated: Jan 22, 2020, 07:43 AM IST
....हे कारण देत मुख्यमंत्र्यांनी नाही पाहिला 'तान्हाजी'
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : यंदाच्या वर्षी अगदी सुरुवातीलाच अभिनेता अजय देवगन याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'तान्हाजी' या चित्रपटाने रसिकांची मनं जिंकली. एक अभिनेता म्हणून हा चित्रपट अजय देवगनसाठी अतिशय खास होता. बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करणारा हा चित्रपट खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा पाहणार अशा चर्चांनी जोर धरला होता.

मुंबईतील प्लाझा सिनेमा इथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमानंतर या चित्रपटाचं स्क्रिनिंग करण्याचं योजण्यात आलं होतं. जिथे अजय देवगनचीही उपस्थिती अपेक्षित होती. 'वाईल्ड मुंबई' या चित्रफीतीचा शुभारंभ करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री तेथे आलेही. पण, त्यांनी एक कारण देत हा चित्रपट पाहणार नसल्याचं स्पष्ट केलं. 

आपण अजय देवगनसोबत चित्रपट पाहणार असं सांगण्यात आलं होतं. पण, तसं नसून आपण आजच्या दिवशी हा चित्रपट पाहणार नाही. पण, येत्या काही दिवसांमध्ये मी माझ्या संपूर्ण मंत्रिमंडळासोबतच हा चित्रपट पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या घडीला हा चित्रपट पाहिला  नसला तरीही येत्या काळात मात्र ते हा चित्रपट नक्की पाहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. 

तान्हाजीची सर्वदूर प्रशंसा 

ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. इतकच नव्हे, तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रतिसादही दिला आहे. परिणामी चित्रपटाच्या कमाईचे आकडेही दिवसागणिक वाढतच आहेत. अशा या चित्रपटाच्या वाटेत यशासोबतच टीकेचा सूरही आळवला गेला आहे. ऐतिहासिक प्रसंगांची मोडतोड करत सादर केल्यामुळे काहींनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली. या चित्रपटात 'उदयभान' ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेता सैफ अली खान यानेही ही बाब स्वीकारली. त्यामुळे आता नव्याच मुद्द्याने डोकं वर काढलं आहे.