मुंबई : शहरात बुधवारी थंडीचा (Cold) विक्रम नोंदला गेला. बुधवार हा चालू वर्षातील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस ठरला. बुधवारी किमान तापमान 15.3 डिग्री सेल्सियस इतके (low temperatures) नोंदवलं गेले आहे. यंदाच्या हिवाळ्यात यापूर्वी सर्वात किमान 15 डिग्री इतके तापमान गेल्या 29 डिसेंबर रोजी नोंदलं गेले. गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये सर्वात कमी तापमान 11.4 डिग्री सेल्सियस इतके नोंदले गेले होते. (Cold in Mumbai)
नैऋत्येकडून येत असलेल्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मुंबईत पुढील काही दिवस थंडगार वातावरण असेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात घट झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात 10 ते 12 डिग्री सेल्सियस इतके तापमान राहील, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
मुंबईत थंडीचा विक्रम, बुधवार ठरला वर्षातला सर्वात थंड दिवस#Cold #Mumbai pic.twitter.com/bsShnrnwDl
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 28, 2021
जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईकरांना हुडहुडी भरल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपासून मुंबईत तापमान 18 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेले पाहायला मिळाले. जानेवारी महिना कडाक्याच्या थंडीचा महिना असतो आणि जानेवारी शेवटी मुंबईत कमालीची थंडी जाणवेल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता.