नाना पाटेकर - उद्धव ठाकरे यांच्यात गुफ्तगू !

....

Updated: Jun 10, 2018, 12:36 PM IST
नाना पाटेकर - उद्धव ठाकरे यांच्यात गुफ्तगू ! title=

मुंबई: एका बाजूला रोखठोक आणि तितकीच मनमोकळी मतं व्यक्त करणारे अभिनेता नाना पाटेकर. तर, दुसऱ्या बाजूला शांत, संयमी पण तितक्याच आक्रमकपणे आपला मुद्दा मांडणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. या दोन्ही व्यक्तिमत्वांबाबत लोकांमध्ये नेहमीच प्रचंड उत्सुकता. अशी ही दोन्ही व्यक्तीमत्वे जाहीर कार्यक्रसाठी एकत्र आली आणि त्याच कार्यक्रमात एका बाजूला जाऊन एखाद्या विषयावर सर्वांसमोर गुप्तपणे संवाद साधू लागली तर मग? चर्चा तर होणारच ना...! असेच घडले आहे.

निमित्त होते शिरीष कणेकर यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याचे. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज उपस्थित होते. आता कार्यक्रमात मान्यवर काय बोलणार याबाबत उपस्थितांना उत्सुकता होती. पण, दरम्यान एक वेगळाच प्रसंग उपस्थितांना पहायला मिळाला. ज्याची आता राजकीय वर्तुळातही चर्चा होऊ लागली आहे.

नाना-उद्धव यांच्यात गुप्त चर्चा

प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू व्हायला काहीसा अवधी होता.  दरम्यान,  नाना पाटेकर यांनी उद्धव ठाकरे यांना एका बाजूला नेले आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला. या दोघांमध्ये साधारण पाच ते सात मिनिटं संवाद सुरू होता. पण, गंमत अशी की ते काय बोलत आहेत हे त्यांच्यापासून काही अंतरावर असलेल्या मंडळींना ऐकूच येत नव्हतं. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. या दोघांमध्ये नेमकं गुफ्तगू चाललंय तरी काय अशी उत्सुकता काही काळ निर्माण झाली. पण, दोघांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर आणि काय चर्चा याचा तपशील काही बाहेर आला नाही. नाना आणि उद्धव यांच्यात उघडपणे रंगललेल्या अशा गुफ्तगूची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

गडकरींच्या 'त्या' भेटीमुळे गुफ्तगूला मोठे महत्त्व

दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून सध्या संपर्क फॉर समर्थन हे अभियान जोरदारपणे राबवले जात आहे. या अभियानांतर्गत भाजपचे केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नाना पाटेकर यांची शुक्रवारीच भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर आणि उद्धव यांच्यात झालेल्या 'त्या' संवादाला महत्त्व प्राप्त झाले आहे.