Aslam Shaikh, ED : माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख (Aslam Shaikh) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण कथित मढ स्टुडिओ घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) मुंबई महापालिकेकडून अहवाल मागवला आहे. (ED sought report from Mumbai Municipal Corporation) अस्लम शेख यांनी मढ मार्वेत एक हजार कोटींचा स्टुडिओ घोटाळा केल्याचे आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केले होते. (Political News)
याप्रकरणी मुंबई महापालिका आयुक्तांनी मढ, एरंगल आणि भाटी गावातल्या 49 स्टुडिओंसंदर्भात चौकशी समिती स्थापन केली होती. याच चौकशी समितीचा अहवाल आता ईडीने मागवला आहे. मनी लाँड्रिंग आणि फेमा कायद्यानुसार हा अहवाल तपासणार असल्याचं ईडीने म्हटले आहे.
- मुंबईत मालाड पश्चिममध्ये मढ, एरंगलमध्ये व्यावसायिक स्टुडिओचं बांधकाम
- मढच्या समुद्रात नियमांना धाब्यावर बसवत स्टुडिओचं बांधकाम केल्याचा आरोप
- 5 स्टुडिओ सीआरझेड झोनमध्ये येत असल्याचा भाजप नेते किरीट सोमय्य यांचा आरोप
- अस्लम शेख यांनी स्टुडिओच्या बांधकामास मदत केल्याचाही सोमय्यांचा आरोप
- सोमय्यांच्या तक्रारीनंतर पर्यावरण विभागाकडून अस्लम शेखना नोटीस
किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्या तब्बल 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत. महाविकास आघाडी हे लुटारु सरकार होते. गेल्या दोन वर्षात माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी, मढ या भागात तब्बल 28 फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम सुरु केले आहे. यातील 5 स्टुडिओ हे सीआर.झेड झोनमध्ये आहेत. मंत्रालयाने फक्त फिल्म सेट लावण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने तिथे 10 लाख स्केअर फूटची जागा मोकळी करgन 28 स्टुडिओ बांधण्यात आले, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.