नववीच्या पुस्तकात बोफोर्स-आणीबाणीचा उल्लेख, काँग्रेसचा आक्षेप

महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक संशोधन निर्मितीनं नववीच्या पुस्तकामध्ये बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधानपरिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली.

Updated: Jul 31, 2017, 04:33 PM IST
नववीच्या पुस्तकात बोफोर्स-आणीबाणीचा उल्लेख, काँग्रेसचा आक्षेप  title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक संशोधन निर्मितीनं नववीच्या पुस्तकामध्ये बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधानपरिषदेत स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली.

कोणत्याही कोर्टानं राजीव गांधींना दोषी असल्याचं म्हटलं नाही उलट निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. हे एकप्रकारचं ब्रेन वॉशिंग आहे. राष्ट्रीय नेत्यांवर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. ही सरकारची फॅशन झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. याचबरोबर मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणा आणल्या आधार कार्ड आणलं, आरटीआय आणलं पण त्याबद्दल एकही ओळ का नाही असा सवाल काँग्रेसनं विचारला आहे.

राजीव गांधी-इंदिरा गांधींनी देशासाठी प्राणाची आहुती दिली. तुमच्याकडे असा एक तरी नेता आहे का. देशासाठी तुम्ही काय योगदान दिलं आहे, अशी टीका काँग्रेसनं केली आहे.

काँग्रेसच्या या आक्षेपाला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी संशोधन समितीला कळवेनं असं म्हटलंय. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप नको असा टोलाही त्यांनी विरोधकांना लावला.