शिवाजी पार्कात ठेकेदारांच्या कामगारांचा दारु पिऊन गोंधळ

काम करण्यास नेमलेले कर्मचारी शिवाजी पार्क मैदानात उघड्यावर दारु प्यायला बसलेले दिसत आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 5, 2017, 11:25 AM IST
  शिवाजी पार्कात ठेकेदारांच्या कामगारांचा दारु पिऊन गोंधळ title=

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबोडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर ला लाखो आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीत दर्शनासाठी येतात. पालिकेच्या ठेकेदार यांनी या अनुयायांची व्यवस्था करणे अपेक्षित असताना एक विचित्र प्रकार फेसबुक लाईव्हतून समोर आला आहे. 

अनुयायांची रेलचेल 

६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आंबेडकर अनुयायांची २-३ दिवसांपासून चैत्यभूमी परिसरात रेलचेल सुरू होते. यांची राहण्याची व्यवस्था पालिका कर्मचारी आणि ठेकेदार करत असतात.

पण ठेकेदारांची माणसे मदत करण्याचे सोडून दारू पितानाच फेसबुक लाईव्हमध्ये दिसत आहेत.

उलट दादागिरी 

 विकास रोडे आणि सागर झेंडे या तरुणांनी केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये पालिकेचे ठेकेदारांनी काम करण्यास नेमलेले कर्मचारी शिवाजी पार्क मैदानात उघड्यावर दारु प्यायला बसलेले दिसत आहेत.

विकास आणि सागर पहार मागण्यासाठी गेले असता त्यांच्यासमोर हा प्रकार आला. याबद्दल कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांनी उलट दादागिरी करण्यास सुरुवात केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. 

फेसबुक लाईव्ह 

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे आणि जाब विचारल्यावर उलट बोलणे हे खूपच विचित्र घडत होते म्हणून फेसबूक लाईव्हद्वारे आम्ही ही घटना समोर आणल्याचे विकास रोडे याने 24taas.com ला सांगितले.

 

दारूड्यांचा माफीनामा 

 दारु पिणाऱ्या या कर्मचाऱ्यांची शिवाजी पार्क पोलिसांत रितसर तक्रार करण्यास गेले असता त्यांनी याची माफी मागितली आणि पुन्हा असा प्रकार होणार नाही याची हमी दिली.

 अनुयायांची व्यवस्था 

 ओखी वादळामूळे मुंबईत अचानक पाऊस सुरू झाला आहे. त्यामूळे  दादर परिसरात जमलेल्या अनुयायांची राहण्याची व्यवस्था जवळच्या पालिका शाळांमध्ये करण्यात आली आहे.