मुंबई : कोरोना (Coronavirus) काळात मुंबईकरांसाठी (Mumbai) एक चांगली बातमी आहे. मुंबई लेव्हल-1 मध्ये आली आहे. (Mumbai comes in level-1) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मुंबईत नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र, भविष्यात कोणताही धोका नको म्हणून मुंबई लेव्हल 1मध्ये आली तरी निर्बंध अद्याप लेव्हल तीनचेच राहितील, अशी माहिती मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी आज येथे दिली.
मुंबई जरी लेव्हल 1 मध्ये आली असली तरी निर्बंध मात्र सध्याचेच लेव्हल 3चे राहणार आहेत. पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील याचा निर्णय उद्यापर्यंत घेवू, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले. सर्व गोष्टींचा विचार करून टप्याटप्याने निर्बंध दूर केले जातील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसात मुंबईचा पॉझिटिव्हिटीचा रेट घसरला आहे. गेल्या आठवड्यात मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर 3.79 टक्क्यांवर आला आहे. त्याआधीच्या आठवड्यात हाच दर 4.40 टक्के इतका होता.
दरम्यान, तज्ज्ञांनी दोन चार आठवड्यांत तिसरी लाट येईल, असा अंदाज दर्शवला आहे. त्यामुळे त्याची पूर्वतयारी करायची आहे आणि अधिक सतर्कता बाळगायची आहे. त्यामुळे मुंबई लोकल प्रवासासाठी अधिक कळ सोसावी लागेल, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले. त्यामुळे मुंबईत लोकल सेवेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन लोकलबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सध्यातरी मुंबईतील लोकलमधून प्रवास करता येणार नाही.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पहिल्या लाटेपेक्षा अधिक वेगाने पसरलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक रुग्णांचे बळी घेतले. मुंबईतील आरोग्य यंत्रणेनेही कोरोनाच्या लाटेला रोखण्यासाठी सर्व प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे.