'डॅडी' घरात लॉकडाऊन; मांडला कॅरमचा डाव

लॉकडाऊनमुळे सर्वच घरात 

Updated: Apr 5, 2020, 12:56 PM IST
'डॅडी' घरात लॉकडाऊन; मांडला कॅरमचा डाव

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करून आता १० दिवस झालेत. सतत कामापाठी धावणाऱ्या मुंबईकरांना घरात वेळ कसा काढायचा हा प्रश्न पडला आहे. प्रत्येकजण यासाठी ना ना तऱ्हेच्या पर्यांयाचा वापर करत आहेत. कुणी आपले छंद जपत आहेत तर कुणी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अस असताना पॅरोलवर असलेला कुख्यात गुंड अरूण गवळी 'क्वीन'च्या पाठी असल्याचं एका व्हिडिओतून कळतंय. 

अरूण गवळीच्या जावयाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अरूण गवळी आपल्या कुटुंबासोबत म्हणजे मुलगी गीता आणि योगितासोबत कॅरम खेळत आहेत. हा व्हिडिओ अरूण गवळीच्या जावयाने अक्षय वाघमारेने शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Family time  #stayhome #staysafe #familytime  #daddy @cupidsillyshell @geetajay @twinkledustatmita @asha_arun_gawli_official_

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare) on

अरुण गवळी शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. याआधी, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली होतीकुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २७ फेब्रुवारीला पॅरोल मंजूर केला आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. पत्नी आजारी असल्याच्या कारणास्तव गवळीने ३० दिवसांची पॅरोल मिळाली आहे.