कोरोनाचा फैलाव : संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवर असे ठेवणार लक्ष

मंत्रालयात राज्यस्तरीय कोरोना नियंत्रण कक्ष तयार केला जाणार आहे.  

Updated: Mar 19, 2020, 10:33 PM IST
कोरोनाचा फैलाव : संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवर असे ठेवणार लक्ष  title=
संग्रहित छाया

मुंबई : मंत्रालयात राज्यस्तरीय कोरोना नियंत्रण कक्ष तयार केला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर कक्ष उभारणार येणार आहे.  नियंत्रण कक्षाची जबाबदारी प्रधान सचिव भूषण गगराणी आणि अपर मुख्य सचिव राजीव जलोटा यांच्याकडे असणार आहे. नियंत्रण कक्ष संपूर्ण राज्याशी जोडला जाणार आहे. संपूर्ण राज्याच्या परिस्थितीवर मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवलं जाणार आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. नव्याने रुग्णांचे भर पडत आहे. देशात प्रथम क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे खूप काळजी घेण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी काही एसटी बस, रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे खूप खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचवेळी संशयित कोरोना रुग्णांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे.

कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, कोरोनाचे जे संशयित आहेत, त्यांना कोरोना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत आहे. मात्र, विलगीकरण केंद्रातून काही जण पळून जात आहेत. याबाबत राज्य शासन आणि पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. आता यापुढे कोणीही पळून गेला किंवा पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र पोलिसांनी दिले आहेत.

विलगीकरण केंद्रातून रुग्ण पळून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा रुग्णांवर आता साथीचे रोग अधिनियमान्वये कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी या आदेशाचे पालन करती असे कोणी पळून गेले तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य पोलिसांनी म्हटले आहे.