महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी बाबुंची यादी, सायंकाळी ६ ला, 'झी २४ तास'वर

झी २४ तासवर आज सायंकाळी ६ वाजता तुम्ही पाहा महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी बाबूंची यादी.

Updated: Dec 21, 2021, 05:46 PM IST
महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी बाबुंची यादी, सायंकाळी ६ ला, 'झी २४ तास'वर title=

मुंबई : झी २४ तासवर आज सायंकाळी ६ वाजता तुम्ही पाहा महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी बाबूंची यादी. ही बातमी महाराष्ट्राला हादरवणारी आहे. यात बाबू म्हटलं तर, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचाही भरणा आहे. मुंबई पोलिसातल्या बड्या अधिकाऱ्यांचीही नावं या भ्रष्ट बाबूंच्या यादीत असल्याचं या रिपोर्टमध्ये समोर आलंय.

या प्रकरणातला आयटीचा फायनल रिपोर्ट झी २४ तासच्या हाती आलाय. नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, एमएसआरडीसी, गृहनिर्माण या खात्यांमधल्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची बेहिशोबी आणि बेनामी मालमत्ता जमवल्याचं आयटीच्या चौकशीत उघड झालंय.