Covid-19 : कोरोनाबाबत मोठा दिलासा देणारी बातमी

Coronavirus in Mumbai, Maharashtra​ : आता एक दिलासा देणारी बातमी.  

Updated: Oct 21, 2021, 09:40 AM IST
Covid-19 : कोरोनाबाबत मोठा दिलासा देणारी बातमी title=
संग्रहित छाया

मुंबई : Coronavirus in Mumbai, Maharashtra : आता एक दिलासा देणारी बातमी. मुंबईसह राज्य आता कोरोना साथीच्या विळख्यातून हळूहळू बाहेर पडत आहे. कोरोना संपुष्टात येत असल्याचे मत तज्ज्ञानी व्यक्त केले. 60 ते 70 टक्के समूह प्रतिकारशक्ती नक्कीच निर्माण झाली आहे. राज्यातही अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. मृत्यूचे प्रमाणही तुलनेने कमी झाले आहे. विषाणू म्युटेशनचा वेगही कमी झाला आहे. 

लसीकरणाचा वेग कमालीचा वाढण्याचे उद्दीष्ट

मुंबईत लसीकरणाचा वेग कमालीचा वाढण्याचे उद्दीष्ट मनपाने ठेवले आहे. दिवाळीपूर्वी 100 टक्के मुंबईकरांचा पहिला डोस पूर्ण करण्याचे टार्गेट आहे. विभागांतील झोपडपट्टय़ा, काही इमारतींच्या आवारात आवश्यकतेनुसार लसीकरण शिबिरं आयोजित करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या. लसीकरणासाठी फिरत्या रुग्णवाहिकाही पालिकेने सज्ज केल्यात.

फिरत्या पथकामार्फत लसीकरण

मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडून आजपासून दादर, माहीम, धारावीत फिरत्या पथकामार्फत लसीकरण सुरू झालंय...ज्या भागांत लसीकरण कमी आहे, अशा इमारती, सोसायटय़ांमध्ये जाऊन हे पथक लसीकरण करणार असून केवळ कोव्हिशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. 

पुण्यात कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

पुणे शहरातून एक दिलासादायक बातमी आहे. 265 दिवसांनंतर कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही...स्वतःचा जीव धोक्यात घालून पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोनाबाधितांना वाचवलं...त्यामुळे महापालिकेत बुधवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

देशात भव्य सेलिब्रेशनची तयारी

दरम्यान, शंभर कोटी लसीकरण निमित्त देशात भव्य सेलिब्रेशनची तयारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. आज 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला जाण्याची शक्यता आहे. त्यानिमित्तानं देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंवर तिरंगा रूपात विद्युत रोषणाई केली जाणार आहे.