15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं आजपासून लसीकरण, कुठे आणि कोणत्या वेळेत असेल?

मुंबईच्या 9 लसीकरण केंद्रावर लसीकरण केलं जाणार

Updated: Jan 3, 2022, 07:21 AM IST
15 ते 18 वयोगटातल्या मुलांचं आजपासून लसीकरण, कुठे आणि कोणत्या वेळेत असेल?  title=

मुंबई : आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होत आहे. मुंबईच्या 9 लसीकरण केंद्रावर लसीकरण केलं जाणार आहे. खास करून सुरूवातीला मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांना बसमधून लसीकरण केंद्रावर आणलं जाणार आहे. लसीकरण झाल्यानंतर पुन्हा शाळेत सोडलं जाणार आहे. मुलांना त्रास झाल्यास उपचारासाठी लसीकरण केंद्रावर पीडियाट्रिक वॉर्ड सुद्धा तयार करण्यात आला आहे.

15 ते 18 वयोगटातील युवकयुवतींना कोरोना प्रतिबंधक लस देण्‍याची सुरुवात आजपासून होत आहे. यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे. (Omicron And Lungs : ओमायक्रॉन फुफ्फुसाकरता किती घातक? अभ्यासात खुलासा) 

मुंबईत या ठिकाणी लसीकरण

बीकेसी मध्ये सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत एका मुलाला लस देण्यात येईल. मुलांसाठी वेगळं प्रवेश द्वार आणि बसण्याची व्यवस्था असेल तसंच त्यांच्यासाठी वेगळे 10 कक्ष ठेवण्यात आले आहेत. 

आजपासून नोंदणी तर करूच शकता तसंच 3 पासून वॉक इन नोंदणी सुद्धा करता येणार आहे. शाळेचं आयकार्ड दाखवून मुलांना नोंदणी करता येणं शक्य आहे

रायगड जिल्ह्यात या ठिकाणी लसीकरण 

रायगड जिल्‍हयात या वयोगटातील साधारण 1 लाख 45 हजार 383 इतके लाभार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय तसेच चौक, जेएनपीटी उरण, कर्जत, कशेळे, खोपोली, महाड, म्हसळा, माणगाव, मुरुड, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन येथील ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालय अशा 14 आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील 10 अशा मिळून एकूण 24 आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. युवा लाभार्थीना केवळ कोवॅक्सिन लस दिली जाणार आहे.

लहान मुलांसाठी कोविड लसीकरण नोंदणी प्रक्रिया 

Covid-19 Vaccination Registration for children’s: १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. याबाबतील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे.

विद्यार्थी आयडीने कोविड लसीसाठी नोंदणी कशी करावी?

डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले की नोंदणीसाठी दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा (आइडेंटिटी प्रूफ) म्हणून ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसतील.