सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक

उद्या आरोपी काकुळतेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

Updated: Apr 1, 2019, 11:39 PM IST
सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी पालिका अधिकाऱ्याला अटक  title=

मुंबई : सीएसएमटी स्थानकाजवळील पूल दुर्घटनेत 6 निष्पापांचा नाहक बळी गेला. या दुर्घटनेतील पहिली अटक करण्यात आली आहे. सीएसएमटी पूल दुर्घटने प्रकरणी पालिका अधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक अभियंता एस.एफ. काकुळते असे आरोपीचे नाव आहे. सीएसएमटी पुलासंबंधी स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले होते. मुंबई पालिकेने दोन पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यातील काकुळते विरूद्ध आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी उद्या आरोपी काकुळतेला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मुंबई पूल दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर जखमींना 50 हजार मदत- मुख्यमंत्री

दुर्घटनेवरून ब्लेमगेम

सीएसएमटी पूल दुर्घटना: २२ मार्चला मुंबई हायकोर्टात सुनावणी

सीएसएमटी स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचा काही भाग कोसळला. त्यात ६ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जबाबदार मध्य रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुलाच्या दुर्घटनेवरून ब्लेमगेम सुरू झाला होता. रेल्वेकडून दुरुस्तीची परवानगी मिळाली नसल्याचा महापौरांनी आरोप केला तर हा पूल महापालिकेचा असल्याचा दावा रेल्वेनं केला.
दुर्घटनाग्रस्त पूल रेल्वेचाच असून त्याची दुरूस्ती मुंबई महानगरपालिका करत होती. मात्र, पुलाच्या दुरूस्तीसाठी महापालिकेने रेल्वेकडे परवानगी मागूनही रेल्वेने ती दिली नाही, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला होता. यानंतर काही तासांत पालिकेने स्वत:हून हा पूल आमच्याच अखत्यारित येत असल्याची कबुली दिली.