छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झाले 130 वर्षांंचं

  जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने गौरवलेल्या, तसंच स्थापत्यशैलीचा अदभुत नमुना अशी ओळख असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सी एस एम टी इमारतीला एकशे तीस वर्षे पूर्ण झाली आहेत.

Updated: May 20, 2018, 08:19 PM IST
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झाले 130 वर्षांंचं  title=

देवेंद्र कोल्हटकर झी मीडिया मुंबई :  जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने गौरवलेल्या, तसंच स्थापत्यशैलीचा अदभुत नमुना अशी ओळख असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सी एस एम टी इमारतीला एकशे तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. २० मे याच दिवशी या ऐतिहासिक वास्तूनं १३० वर्षं पूर्ण केली आहेत. 

जागतिक वारसा म्हणून युनेस्कोने गौरवलेल्या, स्थापत्यशैलीचा अदभुत नमुना असलेल्या तसेच मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटीच्या इमारतीला एकशे तीस वर्षे पूर्ण झालीत.130 वर्ष पूर्ण करणाऱ्या या वास्तूच सौन्दर्य आज ही अबाधित आहे.देशी विदेशी लाखो पर्यटकांना ही वास्तू आज ही भुरळ घालत आहे.

मुंबई या मायानगरीची ओळख ज्या इमारतीमुळे होते ती आताची छत्रपती शिवाजी महाराज turmiuns आणि पूर्वीची व्हिक्टोरिया turminus ही इमारत आता 130 वर्षाची झाली आहे.
1878 ला या इमारतीच्या बांधकामाला सुरवात झाली. 1888 पर्यंत म्हणजे 10 वर्ष या इमारतीच बांधकाम सुरू होत सुरू होत. राणी व्हिक्टोरियाच्या 50 व्या वाढदिवसा निम्मित ही इमारत उभारण्यात आली होती. त्या काळी 16 लाख 14 हजार रुपये खर्च करण्यात आले. या वास्तूची निर्मिती करताना भारतीय वास्तुकला लक्षात घेऊन गॉथिक शैलीत या वास्तूची उभारणी करण्यात आली. इंग्रजी आद्यक्षरातील ‘सी’ अक्षराच्या आकारात एक अत्याधुनिक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्व-पश्चिमरीत्या बांधकाम करण्यात आले.गॉथिक शैलीतील उत्कृष्ट बांधकामाचा नमुना म्हणून ही इमारत ओळखली जाते.

2004 मध्ये या इमारतीचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा लाभलेल्या स्थळांच्या यादीत केला आहे.या इमारतीची भव्यता,सौन्दर्य, स्थापत्य कलेचे बारकावे पाहण्यासाठी अभ्यासण्यासाठी देश विदेशातून लाखो पर्यटक या इमारतीला भेट देत असतात आणि या इमारतीच सौन्दर्य डोळ्या मध्ये साठवत असतात.बॉली वूड मध्ये कवचितच एखादा चित्रपट असेल ज्या मध्ये मुंबई चा उल्लेख आहे मात्र ही इमारत दाखवण्यात आली नाही. जुन्या चित्रपटात तर नोकरीच्या शोधात आलेला नायक या इमारतीच्या बॅकग्राऊंड वरच त्याची एन्ट्री होते त्यामुळेच मुंबईत देशाच्या कुठल्याही कोपऱ्यातून आलेला पर्यटक या इमारतीला भेट दिल्याशिवाय राहत नाही.

मध्य रेल्वेच मुख्यालय असलेली ही वास्तू देशातील सर्वात गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक आहे त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज turminus सारख्या वास्तू पुन्हा पुन्हा होणे नाही त्यामुळे अश्या जागतिक दर्जाच्या वास्तूंचे जतन संवर्धन आणि निगा राखण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे....