Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाची तीव्रता दाखवणारे मुंबईतील 5 भयंकर व्हिडिओ

दिवसभर तौत्के चक्रीवादळाने मुंबईला झोडपलं....

Updated: May 17, 2021, 08:41 PM IST
Cyclone Tauktae : तौत्के चक्रीवादळाची तीव्रता दाखवणारे मुंबईतील 5 भयंकर व्हिडिओ

मुंबई : तौत्के चक्रीवादळ हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकत आहे. तौत्के चक्रीवादळ केरळ, कोकण, मुंबई करत गुजरातकडे पुढे सरकलं आहे. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरांना सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाला सामोरं जावं लागलं. तौत्के वादळ हे आता गुजरातच्या दिशेने सरकत आहे.

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील भागात या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय. रस्त्यांवर अनेक ठिकाणी झाडं कोसळलेल्या अवस्थेत आढळून येत आहेत. महाराष्ट्रातही या चक्रीवादळचा मोठा फटका बसला. त्याचप्रमाणे मुंबईतही अनेक भागात मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा होता. 

दिवसभर मुंबईत हेच चित्र पाहायला मिळालं. तौत्के चक्रीवादळाचं रौद्र रूप आपल्याला मुंबईत पाहायला मिळालं. मुंबईच्या अनेक भागत भयंकर परिस्थिती होती. या भयंकर परिस्थितीची जाणीव करून देणारे हे पाच व्हिडिओ 

पहिला व्हिडिओ हा मुंबईतील कल्याण परिसरातील आहे. कल्याणमधील अनेक ठिकाणी रविवारी रात्रीपासून लाईट नव्हता. तसेच हा व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते कुणाल शुकल यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ इतका भयंकर आहे की, यामध्ये आपल्याला तौत्के चक्रीवादळाची तीव्रता आणि त्याच भीषण रूप पाहायला मिळत आहे. 

व्हिडिओत वादळामुळे पत्रा हवेत उडाला आहे. महत्वाची बाब म्हणजे हा पत्रा हवेतच कागदाप्रमाणे फाटला आहे. आणि त्याचे दोन तुकडे हवेतच झाले आहेत. हा पत्रा अतिशय जोरात खाली कोसळला आहे. 

आपण आज दिवसभरात मुंबईचं प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गेट वे ऑफ इंडियाचा परिसर पाहिला असेल. या परिसरात तौत्के चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे.

ताज हॉटेलमधून अनेकांनी आज तौत्के चक्रीवादळाच रौद्र रूप अनुभवलं आहे. एरव्ही अतिशय शांत असलेला हा समुद्र प्रचंड खवळला होता.

हा व्हिडिओ नेमका कुठचा आहे हे कळू शकलेलं नाही. पण या व्हिडिओतून आपण पाहू शकतो की, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं.

वरळी सी-लिंकचं असं रूप कुणीच या आधी पाहिलेलं नाही. ही परिस्थिती अंगावर काटा आणणारी आहे. आनंद महिंद्रा यांनी हा फोटो शेअर केलाय.

या व्हिडिओतून आपण वरळी सी लिंक अधिक स्पष्टपणे पाहू शकतो.

पहिल्यांदाच ढग समुद्राच्या दिशेने जाताना दिसत आहेत. या व्हिडिओतून मुंबईतील आज दिवसभराची परिस्थिती जाणवत आहे.