विरारमध्ये महिला फेरिवाल्यांची पालिका अधिकाऱ्यांवर दादागिरी

फेरीवाल्या महिलेच्या दादागिरीचा सामना, पालिका अधिका-यांना करावा लागला आहे. विरार पूर्व भागातल्या कारगिल नगर इथल्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका अधिकारी गेले होते.

Updated: Sep 18, 2017, 04:55 PM IST
विरारमध्ये महिला फेरिवाल्यांची पालिका अधिकाऱ्यांवर दादागिरी title=

विरार : फेरीवाल्या महिलेच्या दादागिरीचा सामना, पालिका अधिका-यांना करावा लागला आहे. विरार पूर्व भागातल्या कारगिल नगर इथल्या बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पालिका अधिकारी गेले होते.

तिथे लिंबू सरबत विकणा-या गाड्यावरून बर्फाचा बॉक्स उचलून पालिका अधिकारी निघाले होते. त्याचवेळी या गाड्याची मालकिणीनं हातात कोयता घेऊन, मुलाच्या मोटारसायकलवरून कारवाई करणा-या पालिका अधिका-याचा पाठलाग केला. एवढ्यावरच न थांबता विवा जहांगिर इथे पालिकेची गाडी अडवून, कोयत्याने अधिका-यांना मारण्याची धमकीही तिनं दिली.  या प्रकरणी पोलीस आणि पालिका प्रशासन या महिलेविरोधात काय कारवाई करते याकडे लक्ष लागलं आहे.