लॉकडाऊन काळात इंटरनेटवर 'डॅलगोना कॉफी' व्हायरल

अनेकांनी तर डॅलगोनाला फेटलेली कॉफी असे मराठी नामकरण केले आहे .

Updated: Apr 9, 2020, 09:12 AM IST
लॉकडाऊन काळात इंटरनेटवर 'डॅलगोना कॉफी' व्हायरल title=

मुंबई : लॉकडाऊन काळात एका भन्नाट कॉफीचे फोटो तुम्ही इंटरनेटवर नक्कीच बघितले असतील. कोल्ड कॉफीसारखी दिसणारी ही डॅलगोना कॉफी जगभरातील नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनली आहे . अनेकांनी तर डॅलगोनाला फेटलेली कॉफी असे मराठी नामकरण केले आहे .

जागतिक स्तरावर आणि भारतात सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक नवीन कॉफी रेसिपी. डॅल्गोना कॉफी हे नवीन फॅड आहे, ज्याने इंटरनेटद्वारे वादळ आणले आहे
डॉलकोना कॉफी हा ट्रेंड टिकटॉकवर सर्वात प्रथम सुरू झाला.

#dalgonacoffee हॅशटॅग चा वापर करत दहा लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेंड फॉलो केला आहे . अनेक व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर डॅलगोनाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. फेसबूक इंस्टाग्राम टिकटॉक यूट्युब अशा अनेक ठिकाणी अनेकांनी आपली स्वतःची डालगोना कॉफी बनवून दाखवली आहे. 

'डॅल्गोना' हे नाव दक्षिण कोरियामध्ये एक प्रकारची कोरियन कँडीसाठी डॅलगोना हा शब्द वापरला जातो. त्यातूनच सध्या  डॅलगोना कॉफीचे नाव  एक प्रकारे  व्हिप्ड कॉफी ड्रिंक अर्थात फेटलेल्या कॉफीचा उगम झाला.

दक्षिण कोरियामध्ये प्रथम हा ट्रेंड लोकप्रिय झाला आणि जगात सर्वत्र पसरला, कारण  कोरोनामुळे अनेक देशांनी सामाजिक अंतर राखणे गरजेचे समजले. घरात राहायला सुरुवात केली म्हणूनच लॉकडाऊन काळात ही साऊथ कोरियन कॉफी इंटरनेटवर प्रसिद्ध झाली.

डॅलगोना बनवण्यासाठी समसमान प्रमाणामध्ये दोन चमचे कॉफी पावडर दोन चमचे पिठीसाखर आणि दोन चमचे गरम पाणी एकत्र फेटले जाते. फिरत असताना त्याचा छान घट्ट फेस व्हिप क्रिमसारखा बनवला जातो, त्यानंतर एका ग्लासमध्ये बर्फ टाकून त्यात गार दूध टाकले जाते.

सर्वात शेवटी विप केलेली कॉफीजी घट्ट असते, त्याचा एक सुंदर लेअर सगळ्यात वरती दुधावर ठेवला जातो. 

अशापद्धतीने साधी सोपी एक छानशी उन्हाळ्यातील कोल्डकॉफी तुम्हाला घरबसल्या मिळते. मार्चमध्ये अमेरिकेत या कॉफीची भरपूर चर्चा इंटरनेटवर सुरू झाली. 

डॅलगोना कॉफी हा ट्रेंड सध्या भारतात सुद्धा अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी फॉलो केलेला आहे. 

लॉकडाऊन काळात घर बसल्या काय करावे, असा प्रश्न पडणाऱ्या सुद्धा अनेकांना डालगोना चालेंज करायला उत्स्फूर्त केले जाते आहे, म्हणूनच लोक लॉकडाऊन काळामध्ये डॅलगोना कॉफी अर्थात फेटलेली गारेगार कॉफी सध्या चर्चेचा विषय आहे.