मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत 150 नवे रुग्ण वाढले आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1018वर पोहचली आहे. आज राज्यात एका दिवसांत 12 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे 64 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील 1018 रुग्णांपैकी एकट्या मुंबईत 642 कोरोनाबाधित आहेत. मुंबईत 40 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत राज्यात 79 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईत 642 कोरोना रुग्ण आढळले असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यात 130 जण कोरोनाबाधित असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्ये 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
ठाण्यात 21 जण कोरोनाबाधित असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर कल्याण-डोंबिवलीमध्ये 25 रुग्ण असून एकाचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत 28 जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मीरा-भाईंदरमध्ये तिघे कोरोनाबाधित असून एकाचा मृत्यू झाला आहे. वसई-विरारमध्ये 10 जण कोरोना पॉझिटिव्ह असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल 6, रत्नागिरी, पालघर, यवतमाळमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहेत. तर पालघरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
साताऱ्यात 6, सांगली 26, नागपूर 19, अहमदनगर 18, बुलढाणा 7, औरंगाबादमध्ये 12, लातूर 8, उस्मानाबाद 4, कोल्हापूरमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सातारा, नागपूर, औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक जण दगावला आहे.
उल्हासनगर, जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, गोंदियामध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.
दरम्यान, निजामुद्दीन येथील तबलीगी जमातीत सामिल झालेल्या कोरोनाग्रस्तांचा कसून शोध सुरु आहे. त्यापैकी राज्यात आतापर्यंत 23 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. लातूरमध्ये 8, बुलढाणामध्ये 6 आढळले आहेत. पुणे, पिंपरी, चिंचवड, अहमदनगरमध्ये प्रत्येकी 2 जण सापडले आहेत. तर हिंगोली, जळगाव, वाशिममध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.