डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीची कोठडी

Iqbal Kaskar has ED custody : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीची कोठडी न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली आहे. 

Updated: Feb 19, 2022, 08:05 AM IST
डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीची कोठडी  title=

मुंबई : Iqbal Kaskar has ED custody : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला  सात दिवसाची ईडीची कोठडी न्यायालयाकडून मंजूर करण्यात आली आहे. इक्‍बाल कासकरला मुंबई सत्र न्यायालयात ईडीने रिमांडसाठी हजर केले होते. यावेळी न्यायालयाने कोठडी ठोठावली. (Dawood Ibrahim's brother Iqbal Kaskar has ED custody)

इक्बाल कासकर याला काल ठाणे कारागृहातून ईडीने मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात न्यायमूर्ती एम.जी. देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केले. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी इक्बाल कासकरची ईडीला कोठडी हवी होती. मुंबईतील पीएमएलए न्यायालयाने कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याचा भाऊ इक्बाल कासकरला  25 फेब्रुवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावणी आहे.

न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायमूर्तींनी इक्बाल कासकरला त्याने वकील नेमला आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर इक्बालने मला न्यायालयात आणण्यात येणार असल्याची कोणतीही माहिती नव्हती, असे न्यायालयाला सांगितले. इक्बाल कासाकरच्या वकिलांना इक्बालशी कोर्टात संवाद साधण्याची अनुमती कोर्टाने दिली. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीने अटक केल्याच कोर्टात सांगितले. ईडीने दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात इक्बाल कासकरलाही आरोपी बनवले आहे.

2017 च्या खंडणी प्रकरणात चौकशीसाठी ईडील आरोपीचा रिमांड हवा, असा सरकारी वकिलांकडून युक्तीवाद करण्यात आला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी डी गँगचा भाग आहे. म्हणून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, 3 फेब्रुवारी 2022 साली एनआयएल मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा दाऊद कासकर याच्या नावाने दाखल झाला.