मुंबई : महाराष्ट्राचे महसूली उत्पन्न घटल्याचा निष्कर्ष वित्त आयोगाने काढला आहे. यावरुन आता राजकारण तापले आहे. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, जीडीपी जास्त आहे, तेव्हा 15 व्या वित्त आयोगापुढे आम्ही आमची भूमिका मांडू, असं अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय.
तर राज्याचे कर्ज वाढत आहे. या सरकारला सूर कधीच सापडला नाही. सरकारकडे नेमकं धोरण नाही. फक्त खर्च वाढला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.