मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
मविआ म्हणजे खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवाली की रक्षा करुंगा, अशी खोचक टीका अमृता फडणवीस यांनी केली आहे. कोणत्याही द्वेषापोटी कारवाई नाही, तर महाराष्ट्रात प्रगतीचं राजकारण करावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे, मै खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवाली की रक्षा करुंगा, अशी आहे, हे बंद व्हायला हवं. आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे ते म्हणजे महाराष्ट्रात प्रगतीचं राजकारण व्हावं, भ्रष्टाचार बंद व्हावा, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
याआधीही अनेकवेळा अमृती फडणवीस यांनी ठाकरे सरकारवकर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्ताने अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन डिवचलं होतं. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं, महाराष्ट्र वसूली सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त अपघाती आणि गैरहजर मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा.
तर कोविड भ्रष्टाचारावरुनही अमृता फडणवीस यांनी टीका केली होती. महाराष्ट्र सरकार कोरोना सेंटर्समध्ये भ्रष्टाचार करतं आहे. एवढंच नाही तर उद्योजकांना घाबरवून त्यांच्याकडून वसुली करण्याची योजनाही तयार केली जातं आहे. त्यासाठी आपली काही खास माणसंही त्यांनी हाताशी धरली आहेत. असं म्हणत हॅशटॅग सचिन वाझे असा हॅशटॅगही त्यांनी दिला होता.