विधान परिषदेत मोर्चाचे पडसाद, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका

शेतक-यांच्या मोर्चाचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित केला. तर त्याआधी अजित पवार यांनीही सरकावर यावरून जोरदार टीका केली. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 12, 2018, 12:25 PM IST
विधान परिषदेत मोर्चाचे पडसाद, धनंजय मुंडेंची सरकारवर टीका title=

मुंबई : शेतक-यांच्या मोर्चाचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित केला. तर त्याआधी अजित पवार यांनीही सरकावर यावरून जोरदार टीका केली. 

काय म्हणाले मुंडे?

६ दिवसात १५० किमी चालत हजारो गरीब लोक, शेतकरी, आदिवासी महिला आल्या आहेत. ते सहन करत असलेला त्रास ते पाहून प्रचंड त्रास होत होता. कर्जमाफी, कसणा-याला जमिनी, हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीच्या मागण्या आहेत.

‘शेतकरी लढा देतील’

पाण्याने लाखो शेतकरी आले आहेत आता फसवले तर शेतकरी वीणा अन्न पाणी राहतील आणि लढा देतील. जीवाणू म्हणून हेटाळणी करीत होता. आता का धडकी भरली आहे. आता रात्रीतून का भेट घ्यावी वाटत आहे? रात्रीतून आता पाठिंबा देता आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले.