कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवात मिरवणुकांना परवानगी मिळणं कठीण

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी रोखण्याचं मोठं आव्हान

Updated: Jun 11, 2020, 08:20 AM IST
कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवात मिरवणुकांना परवानगी मिळणं कठीण

मुंबई : मुंबई कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिऱवणुका काढता येणार नाहीयेत. यंदा साधे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. कोरोनामुळे यंदा मिरवणुकांना परवानगी मिळणार नाही. याचं नियोजन करण्यासाठी मुंबईत पोलीस ठाण्यामध्ये गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु झाल्या आहेत.

येत्या २२ ऑगस्टला गणरायाचं आगमण होत आहे. यंदा मुंबईत गणेशमूर्ती घडविण्याचे कामही कमी दिसत आहे. मुंबईत जवळपास १२ हजार ५०० सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. २ महिने आधीच गणेशोत्सवची लगबग सुरु होते. पण यंदा मात्र चित्र वेगळं आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांना यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मंडळांनी गणेशोत्सव यंदा रद्द केला आहे. मुंबईतील गणेशोत्सव हे आकर्षणाचं केंद्र असतं. अनेक शहरातून लोकं येथे येतात. पण मुंबईत पसरलेली महामारी यंदा गणेशोत्सवावर पाणी फेरत आहे.

मुंबईमध्ये दररोज कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. गणेशोमुर्तींची मागणी ही कमी दिसते आहे. त्यामुळे मुर्तीकार देखील मुर्ती बनवताना काळजी घेत आहेत. गणेशोत्सवात पोलिसांवर ताण असतो. पण यंदा ताण आणखी वाढणार आहे. कायदा सुव्यवस्था या सोबतच पोलिसांना आरोग्याच्या दृष्टीने देखील काळजी घ्यायची आहे. त्यामुळे पोलिसांवर अधिक ताण असणार आहे.