मुंबई : कोणाचाही राजकीय दबावाला बळी न पडता काम करण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिलाय. असा दबाव आणला तरी न जुमानण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
आपणही असल्या कामात कधी दबाव आणत नाही. अनधिकृत गोष्टींना अजिबात खतपाणी घालणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. प्रत्येक लोकप्रतिनिधीनं याचं पालन करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संबंधित कंत्राटदार, आर्किटेक्चर यांनाही अनधिकृत बांधकामांसाठी जबाबदार धरून कायदा सर्वांसाठी समान ठेवण्याचं आवाहन त्यांनी आयुक्तांना केलं.
मुंबईत वारंवार लागणार्या आगींवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाने २८ नव्या गाड्यांचा लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सर्व गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं.