डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे बाळ, बाळंतीनीची मृत्यूशी झूंज

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक प्रसूत महिला आणि तिचं नवजात अर्भक मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना मुंबईच्या भांडुप विभागात घडलीय. भांडुपमधील श्रेणिक हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहाचे डॉक्टर याला कारणीभूत असल्याचा महिलेच्या पतीचा आरोप आहे.

Updated: Oct 25, 2017, 12:11 PM IST
डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळे बाळ, बाळंतीनीची मृत्यूशी झूंज title=

मुंबई : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक प्रसूत महिला आणि तिचं नवजात अर्भक मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटना मुंबईच्या भांडुप विभागात घडलीय. भांडुपमधील श्रेणिक हॉस्पिटल आणि प्रसूतीगृहाचे डॉक्टर याला कारणीभूत असल्याचा महिलेच्या पतीचा आरोप आहे.

डेंग्यू असतानादेखील डॉक्टरांनी कोणतीही काळजी न घेता महिलेची प्रसूती केली असल्याचा आरोप महिलेच्या पतीनं केला आहे. महिलेची तब्येत बिघडली तेव्हा नातेवाईकांना कल्पना न देता परस्पर महिलेला मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तसंच तिच्या उपचाराचा खर्च उचलण्याचं आश्वासन डॉक्टर ममता जागियास यांनी दिलं असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

या धक्कादायक प्रकाराबाबत रुग्णालयाशी संपर्क केला असता, या रुग्णालयात डॉक्टर फक्त इमर्जन्सी असल्यावर किंवा व्हिजिट असली तरच असतात. बाकी कारभार इथे नर्सच पाहत असल्याचं चित्र समोर आलं आहे. तर डॉक्टर ममता जागियास यांना यासंदर्भात फोनवरून संपर्क केला असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, नर्सिंग होम आणि डॉक्टरांवर कारवाईची मागणी मौर्य कुटुंबीय करत आहेत.