होणाऱ्या जोडीदाराला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा? जाणून घ्या कोर्टाचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने होणाऱ्या बायकोला अश्लील मेसेज पाठवण्याबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे.

Updated: Nov 20, 2021, 09:13 PM IST
होणाऱ्या जोडीदाराला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा? जाणून घ्या कोर्टाचा निर्णय title=

मुंबई : लग्न करताना आपण मुलगा किंवा मुलगी त्यांचं घरदार हे सगळं पाहूनच लग्न ठरवतो. तर बऱ्याचदा मुलगा किंवा मुलगी आपला जोडीदार स्वत:च ठरवून लग्न करतात. त्यात घरच्यांनी लग्न ठरवुन दिलेली जोडपी लग्न ठरल्यानंतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी बोलायला सुरुवात करतात. काही वेळेला त्यांचं बोलणं हे प्रेमाची सगळी हद्द पार करतात. परंतु आता असा प्रश्न उपस्थित राहिला आहे की, जोडप्यांनी असं बोलणं हे कायद्याने गुन्हा आहे का?

मुंबई उच्च न्यायालयाने होणाऱ्या बायकोला अश्लील मेसेज पाठवण्याबाबत एक महत्वाचा निर्णय दिला आहे. एखाद्या महिलेला लग्नाआधी अश्लील मेसेज पाठवणे हा एखाद्याच्या प्रतिष्ठेचा अपमान होऊ शकत नसल्याचे न्यायालयाने यात स्पष्ट केले आहे.

एका 36 वर्षाच्या व्यक्तीला तब्बल 11 वर्षांनी फसवणूक आणि बलात्कार केल्याच्या आरोपात निर्दोष  मुक्तता मिळाली आहे.

न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, लग्नाआधी एकमेकांना अशाप्रकारचे मेसेज केल्याने जोडप्यांना आनंद मिळतो. तसेच यामुळे एकमेकांप्रती प्रेमळ भावना निर्माण होते. यावरुन जोडीदारा हे देखील कळते की, ती समोरील व्यक्ती किती भावनीक आहे. तसेच यामुळे जवळीकता निर्माण होऊन तो व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी चांगल्याप्रकारे समजून घेतो असं वाटायला लागतं.

मात्र, जर दुसऱ्या व्यक्तीला अशाप्रकारचे मेसेज केलेले आवडत नसेल, तर तो व्यक्ती आपल्या होणाऱ्या जोडीदारासमोर आपलं मत व्यक्त करु शकतो. त्याचबरोबर आपला होणारा जोडीदारही अशापद्धतीचे मेसेज पुन्हा पाठवणार नाही याची काळजी घेईल. परंतु एखाद्याचा अपमान करण्यासाठी असे मेसेज पाठवले जातात असे यावरुन म्हणता येणार नसल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण?

एका महिलेने 2010 मध्ये एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला होता. 2007 मध्ये दोघांची भेट एका मॅट्रीमोनियल वेबसाईटवरुन झाली. मात्र मुलाच्या आईने या लग्नास विरोध दर्शवला. त्यानंतर 2010 मध्ये मुलाने मुलीसोबतचे नातं संपवलं.

त्यानंतर या मुलीने त्या मुला विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. परंतु मुलाने लग्नाचे वचन देऊन मुलीला सोडले आणि तिच्याशी लग्न केलं नाही, याला आपण बलात्कार म्हणू शकत नाही असे न्यायालयाने सांगितले आहे.

संदेश पाठवण्याचा उद्देश काय?

दोघेही लग्नासाठी आर्य समाज हॉलमध्ये गेल्याचे कोर्टात सांगण्यात आले. मात्र लग्नानंतर राहण्याच्या मुद्द्यावरून भांडण झाले आणि शेवटी मुलाने आईची आज्ञा पाळत लग्नाला नकार दिला. ज्यामुळे न्यायालयाने सांगितले की, हे प्रकरण लग्नाच्या खोट्या आश्वासनाबाबत नाही.

कोर्टाने म्हटले आहे की, लग्नाआधी होणाऱ्या जोडीदाराला अश्लील मेसेज पाठवणे म्हणजे दोघांमधील इच्छा व्यक्त करणे होय. त्यामुळे यासाठी त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करु शकत नाही.