ठाणे : डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक व निकटवर्गीय तारिक परवीन याला ठाणे खंडणी पथकाने ताब्यात घेत त्याला अटक केली आहे. मुंबई आझादनगर पोलिसांच्या हद्दीतून त्याला उचलले आहे. १९९३ मुंबई बॉम्ब स्फोटमध्ये तारिकचे नाव होते. तसेच सारा सारा जमीन घोटाळ्याचा तो आरोपी आहे. प्रदीप शर्मा टीमने धडक कारवाई करत ताब्यात घेतले. त्यामुळे डी कंपनीला मोठा हादरा बसलाय.आतापर्यंत पोलिसांनी डी गॅंगच्या तिघांना अटक केलेय. त्यामुळे दाऊदला हा मोठा हादरा मानला जात आहे.
कुख्यात अंडरवर्ल्ड म्होरक्या दाऊदचा आणखी विश्वासू साथीदाराला गजाआड करण्यात पोलीसांना यश आलंय. दाऊदचा अत्यंत निकटवर्ती तारिक परवीनला आज ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधीत पथकाने मुंबईतूून अटक केली. एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या नेतृत्वात तारिकला अटक करण्यात आलीय. तो दाऊदचा विश्वासून साथीदार म्हणून ओळखला जातो. दाऊदच्या सारा सहारा मार्केटसाठी झालेल्या जमीन घोटाळ्यातही त्याचा हात होता. याआधी त्याचा भाऊ इक्बाल कासकर आणि टकला या दोघांना अटक झाली होती. त्यामुळे डॉनला आणखी एक मोठा हादरा बसलाय.
मुंब्र्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका खूनाच्या प्रकरणातही तारिक आरोपी होता. याच खूनाच्या प्रकरणात त्याला खंडणी विरोधी पथकानं अटक केलीय.