ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून धमक्या देऊ नका, उद्धव ठाकरे यांचा इशारा

ठाकरे कुटुंबियांवर हल्ले करणारा असा कुणी जन्माला आलेला नाही तिथल्या तिथे ठेचून टाकू

Updated: Oct 15, 2021, 07:43 PM IST
ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून धमक्या देऊ नका, उद्धव ठाकरे यांचा इशारा title=

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार आणि भाजपाला इशारा दिला आहे. आपल्याला काही जण आव्हान देतायत, हिम्मत असेल तर अंगावर या, आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, कुणी अंगावर आलं तर सोडत नाही. लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का, अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची भाषा करणार असाल तर स्वत:मध्ये हिम्मत आणि धमक असेल तर धमकी द्या, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याच्या माध्यमातून देऊ नका असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

यावेळी त्यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचं उदाहण देत त्यांना चिमटा काढला. परवा हर्षवर्धन पाटील बोलले भाजपात का गेलो, भाजपात गेलेली लोकं भाजपाची ब्रँड अॅम्बेसडर झाली पाहिजेत. टीव्हीवर जाहीराती येतात, एक कोण तरी गोरा माणूस दाखवता, आणि त्याच्या तोंडी हिंदी डब करुन टाकतात, पहले तो मुझे निंद की गोली खाकर भी निंद नही आती थी,  दरवाजे पर टकटक होती तो रोंगटे खडे हो जाते थे, फिर किसे ना काह तुम भाजपमे जाओ, अब भाजपमें जाकर मै कुंभकर्ण जैसी निंद सो सकता हूँ, दरवाजे पर ठोका तो भी उठता नही हूँ. ही काय लायकीची माणसं आहे, आणि ही आपल्या अंगावर येतायत.

एक विकृती हल्ली आलेली आहे आणि मला असं वाटायला लागलेलं आहे, हे जे चिरकणं आहे, ठाकरे कुटुंबियांवर हल्ले कर, हल्ले म्हणजे असा कुणी जन्माला आलेला नाही तिथल्या तिथे ठेचून टाकू त्याला. पण वाट्टेल ते बोलायचं, कुटुंबियांची बदनामी करायची. हे आता त्यांचं रोजगार हमीचं काम झालेलं आहे. कोरोना काळात सर्व बंद आहे, मग काय करायचं, तु चिरकलायस किती हे त्याचे पैस, पण तुम्ही चिरकत राहा, माझा वाडा चिरेंबदी आहे. टकरा मारा, मुंसड्या मारा डोकी फुटतील, पण तडा जाणार नाही. आणि मग वेगवेगळ्या प्रकाराने जे काही प्रयत्न चाललेले आहेत. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मी पक्षप्रमुख म्हणून आव्हान द्यायचं झालं तर या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून देईन, त्यांच्या ताकदीवर देईन, मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामर्द म्हणतात, हे मर्दाचं लक्षण नाही, हिंदूत्वाचं तर नाहीच नाही, अजिबात नाही. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.