Shiv Sena Dussehra Melava 2021 : वचन पाळलं असतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात, मी बाजूला झालो असतो - उद्धव ठाकरे

'मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटू नये, मी तुमच्या घरातला कोणी तरी आहे, तुमचा भाऊ आहे, असं वाटो'

Updated: Oct 15, 2021, 07:57 PM IST
Shiv Sena Dussehra Melava 2021 : वचन पाळलं असतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असतात, मी बाजूला झालो असतो - उद्धव ठाकरे title=

मुंबई : जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातोंनो अशी सुरुवात करत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यंदा शिवाजी पार्कऐवजी षण्मुखानंद सभागृहात दसऱ्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 
 
मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे, आवाज आपला कोणी दाबू शकत नाही, आणि आवाज दाबणारा अजूनही कधीच जन्माला येऊन शकत नाही. 

बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमामा हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनी अशी साद घालता आली. आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात सुवर्ण क्षण आहे. जी पंरपरा शिवसेनाप्रमुखांनी 1966 साली सुरु केली. ती समर्थपणे तुमच्या सर्वांच्या सोबतीने पुढे नेत आहोत याचा मला अभिमान आहे. माझ्यासाठी हा क्षण आणि हा दिवस आपल्या सर्वांचे आशिर्वाद घेण्यासाठी असतो. आपण पाहिलं असेल शस्त्रपूजन केल्यानंतर मी आपल्या खऱ्या शस्त्रांची पूजा केली, आपल्यावर मी फूल उधळली, ही माझी शस्त्र आहेत, जी शिवसेनाप्रमुखांनी मला दिली आहेत. 

आणि हे आशिर्वाद घेत असताना माझ्या मनात नेहमी एक भावाना असते, हेच प्रेम प्रत्येक जन्मी मला माझे हेच आई-वडिल मिळायला पाहिजेत, माझा कुटुंब, माझा परिवार हाच मिळाल पाहिजे. जन्मही महाराष्ट्रातच झाला पाहिजे, आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटू नये. मला तर सोडाच माझ्या तमाम जनतेलाही मी मुख्यमंत्री आहे असं कधी वाटू नये, मी तुमच्या घरातला कोणी तरी आहे, तुमचा भाऊ आहे, असं वाटो ही माझी इश्वरचरणी प्रार्थना आहे. 

काही जणांना असं वाटतं, जे बोलत होते, मी पुन्हा येईन, ते आता बोलतायत मी गेलोच नाही, बस तिकडे आहे तिकड़ेच, पण जे संस्कार आहे, जी संस्कृती आहे, मला जे शिकवलं, की पदं काय आहेत, सत्ता तरी काय आहे, पदं येतील जातील, सत्ता येईल जाईल, परत येईल पुन्हा येईल, पण कधीही अहंपणा तुझ्या डोक्यात येऊ देऊ नको, ज्या दिवशी तुझ्या डोक्यात हवा जाईल त्या दिवशी तू संपलास. नेहमी जनतेशी नम्र रहा, तो प्रयत्न मी करत असतो नम्र पणाने आशिर्वाद घेत असतो, आणि आशिर्वाद हीच खरी ताकद आहे,त मागून कोणाला मिळत नाहीत, हे खरं वैभव आहे, हे खरं ऐश्वर्य आहे. ते जोर जबरदस्तीने कुणाला मिळत नाही. ते कमावावे लागतात आणि ती कमवण्याची परंपरा आपल्याला मिळाली आहे. 

आणखी एक विषय आहे विजयादशमी म्हटलं तर हिंदूत्त्वाची विचारधारा तर आलीच. आज दोन मेळावे असतात, एक शिवसेनेचा आणि एक आरएसएसचा. आपले विचार एक आहेत, धारा वेगळ्या असू शकतात, म्हणून आणि म्हणून केवळ हिंदूत्व म्हणून भारतीय जनता पक्षाशी युती केली होती. ज्यांना अजूनही वाटंत मुख्यमंत्री आहेत, राहिला असतात, पण जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर कदाचित आज नाही तर उद्या तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री झाला असता, पण तुमच्या नशिबात नव्हतं आणि म्हणून तुम्ही वचन मोडलंत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

मी हे पद स्विकारलं, एका जबाबदारीने स्विकारलं, केवळ आणि केवळ मी माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्विकारलं. शिवसेनाप्रमुखांना दिलेलं वचन, तसं मह्टलं तर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही, मी त्यांना सांगितलं आहे की तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवेन, आणि तो मी दाखवनेच. शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित मी राजकारणातून बाजूला झालो असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

माझ्यावर टीका होतेय, होय हे माझं क्षेत्र नाही, मी पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी आलो आणि या क्षेत्रात ठामपणे पाय रोवून उभा राहिलेलो आहे. ही जबादारी खांद्यावर आहे, ती जबाबदारी पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या एका निश्चयाने मी उभा राहिलेलो आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.