मला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

Updated: Aug 1, 2022, 11:37 PM IST
मला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा title=

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला इशारा दिला आहे. मला डिवचण्याचा प्रयत्न करु नका असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्यातील विविध कार्यकर्त्यांची भेटी घेत आहेत. राज्यातील विविध भागांचा ते सोबत दौरा देखील करत आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाकडून त्यांच्यावर सतत टीका सुरु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'शिवसेना भाजप युती आहे. ही युती 2019 ला व्हायला हवी होती. जे अडीच वर्षे पूर्वी होणार होतं ते आम्ही गेल्या महिन्याभरा पूर्वी केलं. तुम्हाला आमची भूमिका मान्य आहे का? आम्ही उघडपणे सगळे केले आहे. लपनू छपून काही केले नाही.'

'भावना गवळी, श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारात बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी यांचा चा फोटो लावला. त्यामुळे लोकांनी निवडून दिले. 162 लोक निवडून दिले. जनतेने भाजप शिवसेनेला कौल दिला. भाजप-सेनेचे सरकार न बनता वेगळे सरकार बनले. सरकार बनल्यानंतर भावना गवळी सोबत काय झाले हे पाहिले.'सरकार असताना कारवाई होत होती. शिवसैनिकांवर होत होती. शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. आमदार बोलत होते हे कसं होणार कसे चालणार, निधी मिळत नाही काम कसं होणार, त्यातच पराभूत आमदारांना निधी दिला जात होता. नगरविकास मधून निधी देत होतो तेही पटत नव्हतं. सगळे आमदार यामध्ये म्हणत होते की निवडून येणार की नाही. मी मांजराच्या गळ्यात घंटा बांधून घेतला, डेरिंग केली.'

बाळासाहेबांनी शिकवलं अन्याय विरुद्ध लढा. आम्ही भूमिका घेतली. बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांचा आशीर्वाद घेऊन भूमिका घेतली. मी छोटा कार्यकर्ता आहे. मी तुमच्यातला आहे. काल सभा होत्या, सिलोड मध्ये एकही माणूस घरात शिल्लक नव्हता, सगळे रस्त्यावर आले होते. लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून ही भूमिका मान्य आहे हे दिसले. आम्ही हे विचारत असतो प्रत्येक जागी. 'बाळासाहेबांची शिकवण होती. शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करणार नाही, नाहीतर दुकान बंद करून टाकणार. 

काँग्रेसने सावरकर यांना माफीवीर म्हटलं. मुंबई स्पॉटमध्ये मंत्र्यांचे कनेक्शन दाऊद सोबत. त्याला वाचवायला आंदोलन हे कसं काय सहन करावं.. आपला अजेंडा लोकाभिमुख आहे. मी जाहीर पणे सांगितले की मला डिवचायला जाऊ नका. मी पातळी सोडत नाही, सहन करतो, मला डिवचले तर मी काही करू शकतो. बोलू शकतो.'