मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रसिद्ध प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.
विद्यापीठातल्या एकूणच कारभाराला कंटाळलो असल्याचं हातेकरांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय. विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा करायची असेल, तर विद्यापीठच्या हिताच्या विचार करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे.
अशा संघटित प्रयत्नांसाठी विद्यापीठाच्या सिस्टिममध्ये राहून काम करणे शक्य नाही. त्यामुळे स्वेच्छा निवृत्ती घेऊन विद्यापीठाचा कारभार सुधारावा यासाठी बाहेरून प्रयत्न करणार असल्याचंही डॉ. हातेकर यांनी स्पष्ट केलंय.