Aryan Khan case : आर्यन याच्याकडून हे नवीन वकील युक्तिवाद करणार, लंडनवरून मुंबईत दाखल

 Aryan Khan case : ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याला बेल की जेल? मिळणार याबाबतचा निर्णय आज होणार आहे.  आर्यन याच्याकडून आता हे नवीन वकील युक्तिवाद करणार आहेत.  

Updated: Oct 26, 2021, 10:59 AM IST
Aryan Khan case : आर्यन याच्याकडून हे नवीन वकील युक्तिवाद करणार, लंडनवरून मुंबईत दाखल

मुंबई : Aryan Khan case : ड्रग्ज प्रकरणात ( Drugs Case) अटकेत असलेल्या आर्यन खान (Aryan Khan) याला बेल की जेल? मिळणार याबाबतचा निर्णय आज होणार आहे. आर्यन खान याच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) जामीन मंजूर होणार का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आर्यन याच्याकडून आता हे नवीन वकील युक्तिवाद करणार आहेत. ते खास लंडनवरून मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत.

अभिनेता शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान या दोघांसाठीही आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आर्यन खान आणि इतर आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत जामीन मिळाला नाही त्याच्याअडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे आर्यन खान याचे वकील आज पूर्ण तयारीनिशी न्यायालयात हजर राहणार आहेत. याचा प्रत्यत आला आहे. कारण माजी एटरर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) आज बाजू मांडणार आहेत.

31 ऑक्टोबरपर्यंत जामीन नाही मिळाला तर आर्यनची दिवाळी जेलमध्येच जाण्याची शक्यता आहे. माजी एटरर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) हे आर्यनची बाजू मांडणार आहेत. माजी एटरर्नी जनरल मुकुल रोहतगी हे आर्यन याची बाजू न्यायालयात मांडणार असल्याने आजच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. मुकूल रोहतगी आता युक्तीवाद करणार आहेत. ते काय युक्तीवाद करणार याचीच उत्सुकता आहे. रोहतगी काल रात्री खास लंडनवरून मुंबईत दाखल झाले आहेत. करंजीवाला अ‍ॅण्ड कंपनीला शाहरुख याने खास हायर केले आहे. अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे हेही युक्तिवाद करताना हजर राहणार आहेत. आज अडीच नंतर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे.

दरम्यान, जर 31 ऑक्टोबरपर्यंत आर्यनला जामीन मंजूर झाला नाही तर दिवाळीही आर्यनला जेलमध्येच काढावी लागणार कारण 1 ते 12 नोव्हेंबर न्यायालयाला दिवाळीची सुट्टी आहे. त्यामुळे याआधी एनडीपीएस न्यायालयाने नाकारलेला जामीन उच्च न्यायालय मंजूर करणार का याकडे लक्ष लागले आहे.