मुंबई : Maharashtra Political Crisis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या डबक्यात पडू, नये असा सल्ला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. नाही तर फडणवीस, भाजप आणि मोदी यांची प्रतिष्ठा जाईल, असे राऊत म्हणाले. गुवाहाटीला गेलेल्या काहींशी संपर्क आहे. त्यांना आम्ही बंडखोर म्हणत नाही, असं राऊत म्हणाले. ईडीला (ED) वाटलं तर मला अटक करावी, आपण घाबरत नाही असं राऊत म्हणाले.
शिंदे अजूनही आमचे सहकारी असून, त्यांच्याशी कोणतीही वैयक्तिक कटुता नाही. त्यांनी परत यावे, असे संजय राऊत यांनी म्हटलेय. पक्षाचे कार्यक्रम माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी ईडीच्या चौकशीसाठी जाणार नाही, ईडीला वाटत असेल तर मला त्यांनी अटक करावी, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
I just came to know that the ED has summoned me.
Good ! There are big political developments in Maharashtra. We, Balasaheb's Shivsainiks are fighting a big battle. This is a conspiracy to stop me. Even if you behead me, I won't take the Guwahati route.
Arrest me !
Jai Hind! pic.twitter.com/VeL6qMQYgr— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
सध्या राज्यात सुरु असलेले राजकारण हे डबक झाले आहे. या डबक्यात फक्त बेडूकच उड्या मारतात. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे फडणवीसांनी या डबक्यात उतरु नये, असे केल्यास फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांची प्रतिष्ठा धुळीला मिळेल, असा सल्ला राऊत यांनी देवेद्र फडणवीस यांना दिला आहे.
It's an order for them to rest there (in Guwahati) till July 11. There is no work for them in Maharashtra: Shiv Sena MP Sanjay Raut on SC order of allowing Eknath Shinde & other rebel MLAs to file a reply to the disqualification notice issued to them by Dy Speaker by July 11 pic.twitter.com/GIKPVSuGIV
— ANI (@ANI) June 28, 2022
सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयाने 11 जुलैपर्यंत या बंडखोरांना आराम मिळाला आहे. यानंतर बंडखोरांना महाराष्ट्रात यावंच लागेल. त्यामुळे सध्यातरी या बंडखोरांचे महाराष्ट्रात काहीच काम नसल्याचे राऊत म्हणाले. ठाकरेंनी काय करावे, हे गुवाहाटीत बसून आम्हाला सांगू नये. आसाममधील काहीजण आमच्यासाठी बंडखोर नाहीत त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये यावे. पक्षप्रमुखांसमोर आपली मते मांडावी आणि प्रश्न सोडवावेत असे ते म्हणाले.