मुंबईत जेट एअरवेजचे माजी सीईओ नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा

जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीचा छापा.

Updated: Mar 5, 2020, 11:33 AM IST
मुंबईत जेट एअरवेजचे माजी सीईओ नरेश गोयल यांच्या घरावर ईडीचा छापा title=
Pic Courtesy: ANI

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणातील (money laundering case) कथित प्रकरणात जेट एअरवेजचे माजी  मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गोयल यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला आहे. ( Enforcement Directorate (ED) raid is underway at the residence of former Chairman of Jet Airways, Naresh Goyal ) नरेश गोयल यांच्या मुंबईतल्या घरावर ईडीने छापा टाकला. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. त्याआधी बुधवारी सकाळी ईडीने नरेश गोयल यांना समन्स पाठवले होते. 

कर वाचवण्यासाठी नरेश गोयल यांनी देशातील आणि पदेशातील कंपन्यांमध्ये देवाण-घेवाण केली होती. तसेच पैसा देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. अजूनही गोयल यांच्या घराची ईडीचे अधिकारी झडती घेत आहेत.

दरम्यान, छापा टाकण्यापूर्वी, फेमा अंतर्गत अंमलबजावणी संचालनालयाने जेट अधिकाऱ्यांच्या जागेसह दिल्ली आणि मुंबईतील १२ ठिकाणी शोध घेतला. यात जेट अधिकाऱ्यांच्या ठिकाणांचा समावेश होता. यापूर्वी गोयल आणि त्यांची पत्नी अनिता यांच्यावर नुकतीच एका ट्रॅव्हल कंपनीत ४६ कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट भागात कार्यालय असलेल्या अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरुपरंबिल यांनी तक्रार दिली होती.

0

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x