'अब्दुल सत्तार नाराज या निव्वळ अफवा'

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य.  

Updated: Jan 4, 2020, 03:42 PM IST
'अब्दुल सत्तार नाराज या निव्वळ अफवा' title=

मुंबई : शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीला लागलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. परंतु शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्यासोबत माझं बोलणं झालं असल्याचं सांगितलं आहे. ते नाराज नाहीत. नाराजीच्या केवळ चर्चा माध्यमांवर होत आहेत. अब्दुल सत्तार नाराज नाहीत त्यामुळे त्यांना मुंबईला बोलावण्याचा विषय येतं नसल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं. 

शिवाय, खातेवाटपाबाबत मुख्यमंत्र्यासोबत चर्चा झाली आहे. थोडयाचं वेळात खातेवाटप जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.    

सत्तारांच्या राजीनाम्यानं महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय तर सत्तारांचं राजीनामनाट्य या सरकारचं खरं रूप दर्शविणारं असल्याची टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय.