Maharashra Shinde Government : महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज शपथ घेतली. राजभवनावर शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशिर्वादाने मी इश्वरसाक्ष शपथ घेतो की' अशी सुरुवात करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी पूर्ण झाल्यावर समर्थकांनी एकच जल्लोष केला.
यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आम्ही बाहेरुन पाठिंबा देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. पण केंद्रीय भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं असा आग्रह केला.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याही माहिती जे. पी. नड्डा यांनी दिली . पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार सांभाळलेले देवेंद्र फडणवीस आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.