मुंबई : संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भावूक झाले होते. त्यांच्या आईनं संजय राऊतांना औक्षण केलं. ईडी कार्यालयात जात असताना संपूर्ण राऊत कुटुंब भावूक झालेलं होतं. त्याचाच EXCLUSIVE व्हिडीओ झी 24 तासच्या हाती आलाय.
संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेलं जात असताना त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आल्यानंतर त्यांची मुलगी विधीता आणि उर्वशी या दोघीही तिथं पोहचल्या होत्या.
ED Arrest Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे. दुपारी त्यांना अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) ताब्यात घेतलं होतं. रविवारी सकाळीच ईडीचं पथक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी पोहोचलं होतं. साडे नऊ तास चौकशी केल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ईडी कार्यालयात घेऊन आले होते. (Shiv Sena MP Sanjay Raut arrested by ED in land scam case)
संजय राऊत यांना आता सोमवारी सकाळी जे.जे रुग्णालयात तपासणीसाठी नेलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाल्याची देखील माहिती आहे.
याआधी संजय राऊत यांना ED ने चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावला होता. मात्र ते हजर राहिले नव्हते. त्यानंतर रविवारी सकाळी ED अधिकारी थेट त्यांच्या घरी पोहोचले होते. दुपारी ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 8 तासानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आम्हाला जेलमध्ये टाकण्याचा विचार करणारे आज स्वत: जेलमध्ये गेलेत. आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. खालच्या पातळीवर टीका केली. पण आम्ही काहीही टीका करणार नाही. कामातून उत्तर देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. ते संभाजीनगरमध्ये बोलत होते.