close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

एक्झिट पोल । राज्यात युतीला मोठा फटका बसणार?

महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. युतीच्या जागांत घट होण्याची शक्यता आहे.

Updated: May 19, 2019, 07:33 PM IST
एक्झिट पोल । राज्यात युतीला मोठा फटका बसणार?

मुंबई : महाराष्ट्र  राज्यात  लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यावेळी महाराष्ट्रात भाजपासह एनडीएने गेल्यावेळी ४२ जागांवर विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या या जागेत घट होताना दिसत आहे. तर याचा फायदा आघाडीला होताना दिसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळवता आल्या होत्या. मात्र, यंदाच्या टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला ३८ जागांवर विजय मिळेल तर युपीएच्या जागांमध्ये वाढ होऊन त्यांना १० जागा मिळू शकतील.

पाहा । एक्झिट पोल काय सांगतायेत, केंद्रात कोणाचे सरकार?

एबीपी-नेल्सन पोल : महाराष्ट्रात काय स्थिती?

 एबीपी-नेल्सन पोलनुसार राज्यात शिवसेनेपेक्षा भाजपाला जास्त फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे युतीकरुन भाजपला फायदा झालेला नाही, असेच चित्र दिसून येत आहे.

एबीपी-नेल्सनच्या पोलनुसार, राज्यात महायुतीला ३४ तर महाआघाडीला १४ जागा मिळतील. पक्षनिहाय अंदाजामध्ये भाजपा -१७, शिवसेना - १७, काँग्रेस - ०४, राष्ट्रवादी काँग्रेस - ९, इतर - ०० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  त्यामुळे गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपच्या जागा घटतील त्यांना शिवसेनेपेक्षा जास्त फटका बसेल तर शिवसेनेची एक जागा कमी होऊ शकते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या जागांमध्ये दुप्पट वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

इंडिया टुडे -अॅक्सिस पोल  

राज्यात या पोलनुसार भाजप - शिवसेना महायुतीला ३८ ते ४२ जागा मिळतील तर काँग्रेसप्रणित आघाडीला ६ ते १० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.