मुंबईत सापडलेले ते अंडे खरंच प्लास्टिकची होती का?, एफडीएचा खुलासा

मुंबईत पोलिसांनी अंड्यांचा टेम्पो सील केला होता..

गणेश कवाडे | Updated: Jan 6, 2020, 06:30 PM IST
मुंबईत सापडलेले ते अंडे खरंच प्लास्टिकची होती का?, एफडीएचा खुलासा  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईत प्लास्टिकची अंडी असल्याची अफवा पसरली होती. कांदिवलीतल्या चारकोप भागात अशी अंडी मिळत असल्याचं सांगितलं गेलं होतं. पण खरंच अशी प्लास्टिकची अंडी मिळत होती का? याबद्दल एफडीएनं खुलासा केला आहे. 

प्लास्टिकची अंडी प्लास्टिकची अंडी म्हणून मुंबईतल्या कांदिवलीत काही दिवसांपूर्वी एकच गोंधळ उडाला. चारकोप भागात एका दुकानात चायनीज आणि प्लास्टिकची अंडी मिळतायत, अशी ओरड सुरू झाली आणि तसे व्हिडीओही व्हायरल झाले. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दाखवतोय की अंड कसं प्लास्टिकचं आहे. 

प्लास्टिकच्या अंड्यांच्या मेसेजचा एवढा धुमाकूळ झाला की नागरिकांनी ते दुकानही शोधून काढलं आणि अखेर पोलिसांनी या दुकानातल्या अंड्यांचा टेम्पोच्या टेम्पो सील करून एफडीएकडे पाठवला. पण एफडीएने यावर खुलासा केल्यानंतर सगळं काही समोर आलं.

प्लास्टिकची अंडी ही केवळ अफवा आहे. प्लॅस्टिकचं अंड तयार केलं जाऊ शकत नाही. आम्ही चारकोपमधल्या अंड्यांची तपासणी केली. आम्हाला यामध्ये काहीही आढळलं नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असं एफडीएकडून सांगण्यात आलं आहे.

प्लास्टिकची अंडी ही फक्त अफवा आहे. प्लास्टिकची अंडी तयार करता येत नाहीत, याची दुकानदारांनाही खात्री होती. घाबरु नका, अफवा पसरवू नका, भरपूर अंडी खा, प्रोटीन वाढवा.