मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या सह्याद्री अतिगृह येथे झालेल्या बैठकीत मास्कवरची बंदी उठविण्यात आली. आता राज्यभरात मास्कची सक्ती नसेल, पण मास्क घालणं ऐच्छिक असेल अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.
दरम्यान, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, गुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व निर्बध हटविण्यात येत आहेत.
याचा अर्थ असा नव्हे की सगळी सूट मिळाली. पण, लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी यासाठी मास्क ऐच्छिक असेल. यामुळे सगळे सण उत्साहाने साजरा करण्यात येतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही साजरी करता येईल. गुढीपाडव्याच्या सणाच्या निमित्ताने ही महत्वाची घोषणा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनामुळे राज्य गेल्या 2 वर्षांपासून कमी जास्त प्रमाणात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यामुळे काही बाबतीत जनतेवर मर्यादा घालण्यात आला होत्या, या निर्बंधातून जनतेची मुक्ती झाली आहे.