मुंबई : मुंबईतील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कमला मिल कंपाऊंड परिसरातील एका निर्माणाधीन इमारतीला शनिवारी सकाळी आग लागली होती. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आग विझवण्यासाठी सध्याच्या घडीला घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. ज्यानंतर अखेर ही आग नियंत्रणात आली.
Mumbai: Fire breaks out in an under construction building near Kamala Mills compound. 5 fire tenders at the spot
— ANI (@ANI) December 29, 2018
सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास निर्माणाधीन इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती समोर आलं होतं. या दुर्घटनेमघ्ये सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. मुख्य म्हणजे गेल्याच वर्षी आजच्याच दिवशी कमला मिल कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणावर अग्नितांडव पाहायला मिळालं होतं. ज्यानंतर ही घटना समोर येत आहे, त्यामुळे ही बाब अनेकांचच लक्ष वेधत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील गृहनिर्माण संस्था, रुग्णालयं आणि इतरही विविध ठिकाणी आगीचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरच आगीचं हे वाढतं सत्र आणि त्यामागची नेमकी कारणं याकडेच आता सर्वांचं लक्ष वेधलं जात आहे. मुख्य म्हणजे यामध्ये प्रशासनासोबतच नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.