भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद नजरकैदेत

पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाल्याचा आरोप

Updated: Dec 29, 2018, 12:01 PM IST
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद नजरकैदेत title=

मुंबई: भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. चंद्रशेखर आझाद चैत्यभूमीवर आले असताना हा प्रकार घडला. यावेळी भीम आर्मीच्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वृत्ताला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, चंद्रशेखर आझाद यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप केलाय. तसेच पोलिसांनी वरळीच्या जांबोरी मैदानातील त्यांच्या सभेलाही परवानगी नाकारली आहे.प्राथमिक माहितीनुसार, चंद्रशेखर आझाद मालाड येथील एका हॉटेलमध्ये राहत आहेत. शुक्रवारी ते हॉटेलच्या बाहेर पडले तेव्हा पोलीस उपायुक्त विनय कुमार राठोड (परिमंडळ १२) यांनी त्यांना हॉटेलमधून बाहेर पडण्यास मज्जाव केला. चंद्रशेखर आझाद यांनी ही क्लीप सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यानंतर काहीवेळातच त्यांनी आपल्याला चैत्यभूमीवर असताना पोलिसांनी अटक केल्याचे ट्विट केले.  यानंतर भीम आर्मीच्या फेसबुक पेजवरून शेअर केलेल्या व्हीडिओत पोलीस कार्यकर्त्यांना ताब्यात घेताना दिसत आहे. पोलिसांनी आम्हाला अटक केली असून त्यांच्याकडून खूपच वाईट वागणूक मिळत आहे. मात्र, आम्ही या दडपशाहीला जुमानणार नाही, असे चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले. यावेळी पोलिसांनी फेसबूक लाईव्ह बंद करण्याचाही प्रयत्न केला. ताज्या माहितीनुसार पोलिसांनी चंद्रशेखर आझाद यांना मालामधील हॉटेलमध्ये स्थानबद्ध केले आहे.

 

निपुत्रिक मोदींना मुलगा गेल्याचे दु:ख काय कळणार?- भीम आर्मी प्रमुख

कोरेगाव-भीमा येथे पार पडणाऱ्या 'विजय दिवसा'च्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुक्रवारीच श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे नेते मिलिंद एकबोटे यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती. त्यानुसार  ३० डिसेंबर ते २ जानेवारी या काळात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

'विजय दिवसा'च्या पार्श्वभूमीवर भिडे-एकबोटेंबर कारवाई