वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.४ खाली आग

 वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. ४ खाली सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 21, 2017, 10:57 AM IST
 वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र.४ खाली आग title=

मुंबई : वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. ४ खाली सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामूळे वांद्रे स्थानकात एकच गोंधळ उडाला. 

ही आग नियंत्रणात आणली गेली आहे. सुदैवाने यामध्ये कोणती जिवीतहानी किंवा गंभीर जखमी झाले नाही. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.पहाटे लागलेल्या या आगीमूळे जास्त गर्दी या प्लॅटफॉर्मवर नव्हती. आग विझवतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  दोन इसम बादलीतून पाणी घेत आग विझवताना दिसत आाहेत. 

परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.